400+ Birthday Wishes In Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

Are you looking for the best birthday wishes in Marathi? If yes, then this article is for you. Below in this article, we have shared 400+ best Marathi birthday wishes. Wishing a birthday in Marathi is a special and unique experience for both parties, and you can find a special way to wish your dear ones on their birthdays. The Marathi language has a rich history, and it has its beauty. So, if you are looking forward to wishing your dear ones on their birthdays, you can use the below-mentioned Marathi language wishes.

All the below featured birthday wishes can be personalized. Moreover, the below-mentioned Marathi language wishes have been written by our team of professional writers. So, if you are looking forward to sending the most loved one on his/her birthday with best wishes, then you can use any of the below-mentioned Marathi language wishes.

आपण मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत आहात? जर होय, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात खाली, आम्ही 400+ मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत. मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हा दोन्ही पक्षांसाठी एक खास आणि अनोखा अनुभव आहे आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास मार्ग शोधू शकता. मराठी भाषेला समृद्ध इतिहास आहे, आणि तिचे सौंदर्य आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक असाल, तर तुम्ही खाली नमूद केलेल्या मराठी भाषेतील शुभेच्छा वापरू शकता.

खालील सर्व वैशिष्ट्यीकृत वाढदिवसाच्या शुभेच्छा वैयक्तिकृत केल्या जाऊ शकतात. शिवाय, खाली नमूद केलेल्या मराठी भाषेच्या शुभेच्छा आमच्या व्यावसायिक लेखकांच्या टीमने लिहिल्या आहेत. म्हणून, जर तुम्ही सर्वात प्रिय व्यक्तीला त्याच्या/तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पाठवण्यास उत्सुक असाल, तर तुम्ही खालीलपैकी कोणत्याही मराठी भाषेतील शुभेच्छा वापरू शकता.


Table of Contents

Birthday Wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी, ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा

आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !


Happy Birthday Wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

उगवता सुर्य तुम्हाला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा….!

फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !


Birthday Wishes For Friend | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.
happy birthday

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्रा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

#हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील…आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

पार्ट्या करा, खा, प्या
नाच, गाणे, फटाके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


Birthday Wishes for Brother in Marathi | मराठीत भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

#भाऊचा #ɮɨʀtɦɖǟʏ म्हणल्यावर ___ #चर्चा तर होणारच * *#भाऊ_नी_राडा_येवढा_केलाय की भाऊच्या #BḯяTн∂a¥ ला चर्चा_कमी_पण ●#मोर्चाच निघेल अश्या #ʟøøḱḯηℊ वाल्या माझ्या #भावा सारख्या मित्राला #जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून #लाख_लाख शुभेच्छा*
HAPPY BIRTHDAY BHAVA

#काळजाचा__ठोका_म्हना_किंवा_शरिरातील_ प्राण_असा_मित्र_आहे_*
*#भाऊ_#आयुष्याच्या_वाटेत_भेटलेला #कोहीनुर_ #हिरा …. .
.ह्या**#काळजाच्या #तुकड्याला*
*#वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्छा…!*
*Happy Birthday:-

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय.. असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
|| Happy Birthday||

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे!

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो
हीच आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

See Also: 500+ Birthday Wishes For Brother In Marathi | मराठीत भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


Funny Birthday Wishes | मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे

Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात.

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे!

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, हॅपीवाला बर्थडे भावा

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला
वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत
पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

साखरेसारख्या
गोड माणसाला मुंग्या
लागेस्तोवर वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, सांगलीचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
#XYZ या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…

जन्मापासूनच जिम‍‍‍ चा शोकीन असलेले,
जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून ६ पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,
काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे.
कोणी सेल्फी काढत असला कि वेढ वाकडा तोंड करून सेल्फी चा मोह करणारे.
कापूस वेचावा तर मनभर आणि दोस्ती करावी तर मरेपर्यंत या तत्वावर चालणारे
सध्या फवारणीचा चस्मा घालणारे तालुक्यावर हवा करत असणारे अशे आमचे जवळचे मित्र #जिगरकाछल्ला
दोस्तीच्या दुनियेतला #जिगर माणूस. #रॉयलभाऊ #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
भका भका हार्दीक शुभेच्छा…..
#शुभेच्छुक:- आपलेच पोट्टे

Dj वाजणार शांताबाई‍, शालु, शिला नाचणार… जळणारे जळणार,
आपल्या XYZ चा बर्थडे म्हणजे शहरा-शहरात चर्चा, चौका-चौकात DJ, रस्त्यावर धिंगाना…
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस,
XYZ बद्दल काय बोलायचं,….. खतरनाक _/_/_ तारीखला राजाचा जन्म झाला..
लहानपणापासूनच जिद्द व चिकाटी… शाळेत असतांना राडा करणारे..
साधी राहणी उच्च विचार, सगळ्या मित्रांच्या मनावर राज्य करणारे,
दोस्ती तुटली नाही पाहिजे ह्या फॉर्म्युलावर चालणारे,
आपल्या Cute Smile नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे….
आमचं काळीज… डॅशिंग चॉकलेट बॉय,
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे….
तसंच मनानं दिलदार…. बोलनं दमदार….. वागणं रूबाबदार…..
आमचे लाडके XYZ यांना वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा…!!!

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखा-दु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!


Happy Birthday Wishes For Father | वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
हैप्पी बर्थडे बाबा

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला
तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते
पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो
Happy Birthday BABA

50th birthday wishes in marathi
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी ही नक्की गाठा
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी.
हॅपी बर्थडे

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि
निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

खरंच बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी धनदौलत आहात.
बाबा तुम्ही आमच्यावर केलेले उपकार मोजता येईल असं एकही
‘माप’ या जगात शोधूनही सापडणार नाही,
बाबा तुमचे उपकार फेडणे या जन्मी तरी शक्य नाही.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझा बाबा… आम्ही आयुष्यभर सावलीत रहावं म्हणून
स्वतः आयुष्य भर उन्हात झिजला, कधी कधी स्वतः
उपाशी राहुन आम्हाला अन्नाचा घास भरविला,
अशा वात्सल्याच्या च्या मुर्तीला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे डिअर फादर

तुम्ही सोबत असल्यावर हे आकाश सुद्धा ठेंगण वाटतं,
अंगामध्ये हत्तीच बळ येतं, बाबा तुम्ही सोबत असल्यावर
हे संपूर्ण जग अगदी मुठीत आल्यासारखं वाटतं.
बाबा तुम्ही माझा आत्मविश्वास आहात.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला
चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने
सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी
जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी
जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बाबा

बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर घेऊन जग दाखवलं,
मायेचा घास भरवून मोठे केलं,
बाबा तुम्ही आपलं दुःख मनात
ठेवुन आम्हाला सुखी ठेवल.
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात…
My Motivation, My Confidence,
My Happiness, My World,
My Real Hero
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझे पप्पा माझ्यासाठी करोडो मध्ये एक आहेत,
जसा चंद्र चमकतो असंख्य चांदण्या मध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅपी बर्थडे पप्पा

चुकलो कधी वाट अंधाररूपी जीवनात तर दिव्यासारखे
आमच्या आयुष्यात प्रकाश देत रहा, बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या
आयुष्यातील खरी त्यागाची मूर्ती कोण
असेल तर ती म्हणजे आपले बाबा,
ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं.

 


Happy Birthday Wishes For Mother In Marathi | आईला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday!

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.

माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते.
हॅप्पी बर्थडे डिअर मदर.

जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या
आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!

मुंबईत घाई
शिडीच्या साई
फुलात जाई
आणि गल्लो गल्लीत भाई
पण या जगात सगळ्यात भारी
आपली आई
आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत … ती म्हणजे माझी आई
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल.
पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई!

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday Mom

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”


Happy Birthday Wishes For Sister | बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी

माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर
बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते.
ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं…
आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा!

थांबा थांबा थांबा
आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या
वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का…
हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली!

एका वर्षात असतात ३६५ दिवस
अन एक महिनात असतात ३० दिवस
या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस
हैप्पी बर्थडे Sister!

लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…

रडवते पण, हसवते पण,
उठवते पण, झोपवते पण,
आई नसून पण,
काळजी करते जशी माझी आई
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!

मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

मुलांमधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

पोरांमधी sweet गर्ल,
क्रश, Attitude गर्ल,
अशा वेग-वेगळ्या नावांनी
Famous असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा!

दिलदार, रुबाबदार, शानदार
व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला
तिच्या Smart भावा कडून
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!

जिला पागल नाही,
महापागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या पागल Sister ला
तिच्या या शरीफ भावाकडून
जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान
माझ्या वेड्या सिस्सूला हैप्पी वाला बर्थडे!

सर्व मुला-मुलींची लाडकी,
त्यांच्या मनावर राज करणारी,
काही झालं तरी मैत्री
तुटली नाही पाहिजे
या फॉर्मुल्यावर चालणाऱ्या
क्युट पोरीला हैप्पी बर्थडे!

Cute Heroine, लै भारी Personality,
बोलणं अन वागणं खतरनाक,
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा cute-dashing सिस्टर ला
लै भारी, लै भारी हैप्पी बर्थडे!

स्वतःच्या Smile ने लाखो
मुलांच्या मनामध्ये घर करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate गर्ल
म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे!

आता तर Dj वाजू लागणार
सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,
आजू-बाजू चे जळणार कारण
आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!

See Also: 500+ Sister Birthday Wishes In Marathi | मराठीत बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


Happy Birthday Wishes For Husband | पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

या Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
Birthday wishes for husband in Marathi language
Birthday wishes for husband in Marathi language

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे
, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

जेव्हा माझा वाईट दिवस येतो तेव्हा
मला माहित आहे की,
आनंदी राहण्यासाठी मी आपल्या प्रेम
आणि आपुलकीवर अवलंबून आहे.
आपण मला नेहमीच खास वाटता.
आज मी तुमचा हा गोड दिवस
खास बनवण्याची संधी घेऊ इच्छिते!

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.

मी तुमच्या सोबत नसते तर
सूर्य चमकलाच नसता!
ज्या दिवशी आपण माझ्या जवळ नसता
तो दिवस मला खूप मोठा वाटतो.
ज्या दिवशी मला आपला स्पर्श जाणवत नाही
तो दिवस मला हताश आणि निराशजनक वाटतो.
प्रिय, आपण आतापर्यंतच्या
सर्वोत्कृष्ट वाढदिवसास पात्र आहात!

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!

तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!

माझ्या आयुष्यात तुमची जागा दुसर कुणी घेऊच शकत नाही
तुम्ही मला इतक प्रेम दिल की तुमच्या शिवाय
मी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. हॅप्पी बर्थडे डियर!

माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.

तुम्ही माझ्या जीवनात आलेली
सर्वात चांगली गोष्ट आहात!
मला इतके हास्य, इतके आनंदी
आणि खूप-खूप प्रेम देऊन
तुम्ही माझं जीवन फुलवलं.
आपल्या वाढदिवशी मला तुम्हाला
धन्यवाद द्यायला आवडेल
आणि मी आठवण करून देऊ इच्छित आहे
कि, मी तुमच्यावर खूप-खूप प्रेम करते.
वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा!

आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!


Happy Birthday Wishes For Wife | पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये
कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

परीसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी.

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You So Much!

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
Happy Birthday Bayko

तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया,
वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!

देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!


Happy Birthday Wishes For Vahini | वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी साठी

वहिनी आहे सर्वांची प्यारी
घरातील सर्वांची आहे राजदुलारी
आला आहे वाढदिवस वहिनीचा
म्हणून देतोय शुभेच्छा खूप सारी..!
Happy Birthday vahini

वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb

आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!

लक्ष्मी ची मूर्ती,
आणि प्रेमाची सुरत
माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे वहिनी

गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या वहिनी,
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुमचे
कोणाची नजर ना लगो तुम्हास, नेहमी आनदी जीवन असो तुमचे
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
वहिनी तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.
Happy Birthday my sister In law
वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छावहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो तुमचे जीवन
आनंदाने भरलेले राहो तुमचे जीवन
वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा वहिनी..!

आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा..!

जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे वहिनी

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते, दीर्घायु
आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.

See Also: 1000+ Happy Birthday Wishes in Marathi | मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा


वरील सर्व वैशिष्ट्यीकृत वाढदिवसाच्या शुभेच्छा चांगल्या आहेत, आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्यापैकी एक वापरू शकता. तुम्ही खालील मराठी भाषेतील शुभेच्छा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करू शकता आणि त्यामुळे त्यांचा दिवस संस्मरणीय आणि विशेष होईल. याशिवाय, वर नमूद केलेल्या मराठी भाषेतील शुभेच्छा छापल्या जाऊ शकतात किंवा तुम्ही ईमेल, Whatsapp, Facebook आणि इतर अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पाठवू शकता.

आम्हाला आशा आहे की मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दलचा हा लेख तुम्हाला उपयुक्त ठरेल. ही सामग्री तुम्हाला कोणत्याही प्रकारे उपयुक्त वाटल्यास सोशल मीडियावर शेअर करा.

All the above featured birthday wishes are good, and you can use any one of them at your convenience. You can share the below Marathi language wishes with your loved ones, and it will make their day memorable and special. In addition, the above-mentioned Marathi language wishes can be printed, or you can send the same through email, Whatsapp, Facebook, and many other online platforms.

We hope this article about the best Marathi birthday wishes is helpful to you. Do share this content on social media if you find it useful for you in any manner.

Leave a Comment